कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे

श्री जोतिबा अथवा केदारेश्र्वर हे बद्रिकेदारेचेच रूप आहे

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला, दैत्यसंहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी जोतिबा हिमालयातून दक्षिणेत आला, अशी कथा केदारविजयात दिलेली आहे

'जोतिबाची' मूर्ती चतुर्भुज, हातात खड्ग, डमरू, त्रिशूल अमृतपात्र या आयुधांसह आहे. अश्व हे त्याचे वाहन आहे 

महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला. तेंव्हा केदारनाथांनी जोतिबांचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अनाचार सुरु केला. करवीरवासियांनी या दैत्यांचा त्रास होत असे, म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला. तेंव्हा केदारनाथांनी जोतिबांचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला

ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे

ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते.