ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा । माझ्या साईनाथा ।
ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा । माझ्या साईनाथा ।
पाचाही तत्वांचा दीप लाविला आता || धृ ||
निर्गुणाची स्थिती कैशी आकारा आली । बाबा आकारा आली ।
सर्वा घटी भरुनी ऊरली साई माऊली || ओवाळू आरती || १ ||
रज तम सत्व तिघे माया प्रसवली । बाबा माया प्रसवली ।
मायेचीये पोटी कैसी माया उद्भवली || ओवाळू आरती || २ ||
सप्तसागरीं कैसा खेळ मांडीला । बाबा खेळ मांडीला ।
खेळुनिया खेळ अवघा विस्तार केला || ओवाळू आरती || ३ ||
ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळा । बाबा दाखविली डोळा ।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा || ओवाळू आरती || ४ |
ऐसा येई बा। साई दिगंबरा।
ऐसा येई बा। साई दिगंबरा।
अक्षयरूप अवतारा। सर्वही व्यापक तू।
श्रुतिसारा। अनुसया त्रिकुमारा।
बाबा येई बा ॥ध्रु॥
काशी स्नान जप, प्रतिदिवशी।
कोल्हापुर भिक्षेसि। निर्मल नदी तुंगा,
जल प्राशी। निद्रा माहुर देशी ॥
ऐसा येईबा ॥१॥
झोळी लोंबतसे वाम करी। त्रिशुल डमरू धारी।
भक्ता वरद सदा सुखकारी।
देशील मुक्ति चारि ॥
ऐसा येईबा ॥२॥
पायी पादुका। जपमाला कमंडलू मृगछाला।
धारण करिशि बा।
नागजटा मुगट शोभतो माथा ॥
ऐसा येईबा ॥३॥
तत्पर तुझ्या या जे ध्यानी। अक्षय त्यांचे सदानि।
लक्ष्मी वास करी दिनरजनी।
रक्षिसि संकट वारुनि ॥
ऐसा येईबा ॥४॥
या परीध्यान तुझे गुरुराया। दृश्य करी नयना या।
पूर्णा नंद सूखे ही काया।
लाविसि हरीगुण गाया ॥
ऐसा येईबा ॥५॥
ऐसा येई बा। साई दिगंबरा।
अक्षयरूप अवतारा। सर्वही व्यापक तू।
श्रुतिसारा। अनुसया त्रिकुमारा।
बाबा येई बा ॥ध्रु॥
श्री साईबाबांची अकरा वचने
शिरडीस ज्याचे लागतील पाय ।
टळती अपाय सर्व त्याचे ॥ १ ॥
माझ्या समाधीची पायरी चढेल ।
दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥ २ ॥
जरी हे शरीर गेलो मी टाकून ।
तरी मी धावेन भक्तासाठी ॥ ३ ॥
नवसास माझी पावेल समाधी ।
धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी ॥ ४ ॥
नित्य मी जिवंत,जाणा हेंची सत्य ।
नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥ ५ ॥
शरण मज आला आणि वाया गेला ।
दाखवा दाखवा ऐसा ॥ ६ ॥
जो जो,मज भजे,जैसा जैसा भावे ।
तैसा तैसा पावे,मीही त्यासी ॥ ७ ॥
तुमचा मी भार वाहीन सर्वथा ।
नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥ ८ ॥
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस ।
मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥ ९ ॥
माझा जो जाहला कायावाचामनीं ।
तयाचा मी रुणी सर्वकाळ ॥ १० ॥
साई म्हणे तोची तोची झाला धन्य ।
झाला जो अनन्य माझ्या पायी ॥ ११ ॥
जयदेव जयदेव दत्ता अवधुता साई अवधुता
जोडुनी कर सब चरणी ठेवितो माथा | जयदेव ॥धृ॥
अवतरसी तूं येता धमर्ति ग्लानी
नास्तिकांनाही तु तादिसी निजभजनी
तू दाविसी नाम सीता असंख्य यांनी
हरिसी दिनांचे तू संकट दिनरजनी ॥१॥
यवन स्वरुपी एक्या दर्शन त्वां दिधले
संशय निरसुनिया व्दैता घालविले
गोपी चंदा मंदा त्यांची उध्दरिते
मोमिन वंशी जन्मुनी लोका तारियते ॥ २ ॥
भेद न तस्वी] हिंदू यवनांचा काही
दावापासी झाला पुनरपि नरदेही
पासी प्रेमाने तु हिंदू पवनांही
दाविसी जात्मत्वाने व्यापक हा साई ॥३॥
देवा साईनाथा त्वत्पदनत
परमापमोहित जनमोचन झणिं व्हावे
त्वत्कृपये सकलांचे संकट निरसावे
देशिल तर ते त्वघश कृष्णाने गाये ॥४ ॥