श्री जोतिबा/केदारनाथ आरती | Shri Jotiba/Kedarnath Aarti

भगीरथी तुलसीतल हिमाचलवासी

भगीरथी तुलसीतल हिमाचलवासी |

न लगत पल खल दुर्जन संहारी त्यासी|

तो हा हिमकेदार करवीरापाशी |

रत्नागिरीवर शोभे कैवल्याराशी ॥१॥

जयदेव जयदेव जय श्री केदारा

दासा संकटवारा भव भय निवारा ॥ धृ ॥ जयदेव

उत्तरीचा देव दक्षिणी आला |

दक्षिणकेदार नाम पावला |

रत्नासूर मर्दनी भक्त रक्षियला |

दास म्हणे, थोर भाग्य लाभला ॥२॥

जयदेव जयदेव जय श्री केदारा

दासा संकटवारा भव भय निवारा ॥धु॥ जयदेव

श्री जोतिबा/केदारनाथ आरती | Shri Jotiba/Kedarnath Aarti

 

हिमाचल सोडूनिया आले केदारा

हिमाचल सोडूनिया आले केदारा

देखोनिया पर्वत सुंदर मनोहर

नाना याती पक्षी नाचती मयुर

तन्मय होऊनि राहे तो जगदीश्वर

जयदेव जयदेव जय श्री ज्योतिर्लिंगा

तव नाम स्मरणे भय जाये भंगा ॥१॥ जयदेव ||

चिंतामणि वारुवरि स्वार तो झाला

दणदणली मेदीनी असुरा पळ सुटला

हय कंपे भय कंपे धरणीधर भ्याला

भक्ता पालुनि, चाला आसुरावरि घाल ॥२॥ जयदेव ॥

स्वरुप सुंदर पाहता भास्कर उदयेला

क्षणमात्रे न लगता रत्नासुर वधिला

सुरवर मुनिजन सकला आनंद झाला

दास यशवंत चेम्हणे, चांगभला ॥३॥ जयदेव ॥

श्री जोतिबा/केदारनाथ आरती | Shri Jotiba/Kedarnath Aarti

 

श्री नाथांची भूपाळी

उठा उठा हो सकळ जन । घेऊ नाथांचे दर्शन

प्रथम नंदी हर बंदुन । चर्पट आंबा वंदुया

वंदन करुनि गजानना । घेऊ नाथांचे दर्शन

नमन करुनि हनुमाना । महालक्ष्मी वंदुया

काळभैरीसी वंदिता । हरते संसाराची व्यथा

इथुन वंदुया जगन्माता । मूळ पीठ येमाई

आदिनाथा वंदुन । पुन्हा नाथांचे दर्शन

रामलिंगा करुनि नमन । तुलसी माता वंदूया

काशी विश्वेश्वरा वंदुन । घेऊ दत्तांचे दर्शन

परमयोगी अत्री नंदन । सखारामे वंदिला

(या भूपाळी मध्ये देवळाच्या आवारातील सर्व देवतांचे दर्शन यमाईसह घडते)

श्री जोतिबा स्तोत्र – स्तवन

नाथ राया नाथ राया जयजय कारी
भव सागरिया तारी देवा, भवसागरीया तारी ॥धृ॥
गाईन निशीदीनी नाम नाथ रायांचे |
जाईल विलया दुःख मनीचे
प्याया अमृत नाथ चरणाचे!
अतुरलो मी कितीअंतरी
नाथराया नाथराया जयजय कारी ॥1॥
भवसागरीया तारी देवा भव सागरीया तारी

क्षणभंगूर या जीवनी नाथ राया।
नामस्मरण तव एक विसावा |
नित्य घडावी नाथ सेवा ।
भक्ति भाव हा मम अनुरीत
नाथराया नाथराया जयजय कारी ॥2॥
भवसागरीया तारी देवा भव सागरीया तारी

श्री जोतिबाच्या नावान चांगभला
श्री नाईकबाच्या नावान चांगभला
श्री काळभैरीच्या नावांन चांगभला
श्री यमाईच्या नावांन चांगभला
श्री चोपडाईच्या नावांन चांगभला

श्री जोतिबा स्तोत्र - स्तवन

Please Follow US & Like Me

Leave a Comment