घोरकष्टोद्धरण स्तोत्र मराठी अर्थ

हिंदू धार्मिक पुस्तकांमध्ये तसेच,पुराण म्हटल्या जाणारी अनेक स्तोत्र आहेत जी देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी म्ह्टली जातात. लोक हे बर्याच काळापासून करत आहेत. प्रत्येक एक स्तोत्र विशेष अर्थ असतो.

स्तोत्र म्हणजे काय ?

स्तोत्र ही वेगवेगळी प्रकारची असून प्रत्येक स्तोत्र प्रत्येकाचा विशिष्ट अर्थ, उद्देश ,विशेष कार्यासाठी उच्चारला जातो. आपण मंदिरात गेल्यास आपल्या दृष्टीस पडत असेल की अनेक लोक मंदिरात स्तोत्रांचे पठन करीत असतात. स्तोत्र म्हणजे काय तर देवाची आराधना करण्यासाठी देवांची केलेली स्तुती होय. स्तोत्र पठन करण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की, आपल्या इष्ट देवतेच्या स्तोत्राचे नियमित पठन केल्याने आपली इष्ट देवता आपल्यावर प्रसन्न होते. तसचं, त्या इष्ट देवतेची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते.स्तोत्रांमध्ये ईश्वराची विविध स्वरुपात स्तुती केली जात असून ईश्वराला प्रसन्न करण्यासाठीचा सरळ सोपा मार्ग आहे.

मित्रांनो, आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोरकष्टोद्धरण स्तोत्र जे संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्र आहे. मानव जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी करीत असलेले प्रयत्न पाहून प. पू. श्री सद्गुरू भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री टेंबेस्वामी यांनी मिळून या “घोरकष्टोद्धारण “स्तोत्राची रचना केली आहे. या स्तोत्राचे पठन केल्याने आपले मानवी जीवनाशी संबंधित अनेक अनेक प्रकारच्या संकटापासून सुटका होवून भक्ती मार्गावर चालण्याचा आपणास लाभ मिळतो. हे स्तोत्र पुढील प्रमाणे

घोरकष्टोद्धरण स्तोत्र

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।।

भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥

त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।।

त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।।

त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥

कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।।

भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥

॥ श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥ प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम् ।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।

घोरकष्टोद्धरण स्तोत्रचे फायदे

वरील पाच श्लोक लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत. तसेच, जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्ती ने पठाण करेल, तो श्रीदत्ता ला प्रिय होईल.जो कोणी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र पुर्ण श्रद्धेने व भक्तीने म्हणतो, त्याच्या वर आलेली भयंकर संकटे नष्ट होऊन तो सहीसलामत सुटतो.प्रत्येक संसारी माणसावर अनेक संकटे येतात. अशा वेळी कुणाचीही कोठूनही मदत मिळत नाही. काय करावे हेच सुचत नाही. तेव्हा तुम्ही या स्तोत्राचे दररोज 108 वेळ पाठ करा (म्हणावे) तुम्हाला चमत्कार कसा घडतो, त्याची जाणीव होईल.

घोरकष्टोद्धरण स्तोत्र कधी व कसे करावे

विशेष संकटकाळी मात्र याचे रोज १०८ पाठ करणे आवश्यक ठरेल. अशा १०८ पाठांनी अभिमंत्रित केलेली विभूती किंवा पाणी अनेक असाध्य रोगांवरही गुणकारी ठरते असे महान अनुभवही आहेत ! श्री टेंबेस्वामी महाराजांनी प्रभू दत्तात्रेयांच्या प्रेमापोटी जी अनेक लहान मोठी स्तोत्रे केली त्या सर्व स्तोत्रात मुकुटमणि म्हणून शोभावे असे हे घोरकष्टोध्दरण स्तोत्र असून भक्तांनी नित्यनियमाने त्याचे अकरा पाठ करून दुःखमुक्त व्हावे व प्रभू दत्तात्रेयांच्या कृपेला पात्र व्हावे.

घोरकष्टोधारण स्तोत्र पाठ 108 च्या पटीत करावा. रोज 12 वेळा याप्रमाणे 27 दिवस व्रत म्हणून केले जाते. 108 ला 12 ने भाग जातो म्हणून ते 12 वेळा म्हणतात. किंवा 3, 4, 9, 12, 18, 27 36 108 वेळा पण म्हणता येईल. उदबत्ती किंवा धूप लावून, त्यासमोर बसून पाठ पूर्ण करावा. धूपाचा अंगारा कपाळावर लावावा. शेवटच्या दिवशी काहीतरी गोड करून देवाला नैवेद्य द्यावा.आज हे स्तोत्र अनेक दत्तस्थानी नियमाने म्हटली जातात. वाडी, गाणगापूर, औदुंबर येथील नित्यक्रमात ते म्हटले जाऊ लागले. इतर अनेक दत्तक्षेत्रातही ते दत्तपुजेनंतर नियमाने म्हटले जाऊ लागले. कित्येक दत्तभक्त घरीही देवपुजेनंतर तालासुरात हे स्तोत्र म्हणून दत्तप्रभुंची प्रार्थना करताना दिसतात. हे स्तोत्र केवळ बाराच ओळींचे (सहा श्लोकी) असल्याने ते म्हणण्यास तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ लागत नाही. यातील प्रत्येक श्लोकाचा शेवटचा चरण सारखाच असून त्याचा अर्थ भयंकर दुःखातून (कष्टांतून) आमचा उध्दार कर, तूला नमस्कार असो असे आहे.

घोरकष्टोद्धरण स्तोत्र मराठी अर्थ

1 श्रीपाद श्रीवल्लभा, देवाधीदेवा, ‘मी’ आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात घेऊन, आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो

2 हे प्रभो, विश्वमूर्ते, माझे माता-पिता-बांधव-त्राता आपणच आहात. आपणच सर्वाचे ‘योग-क्षेम’ पहाता. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररुपी भवसागररूपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो.

3 आपण आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा पापयुक्त त्रिविधतापातून माझी सुटका करावी. माझ्या शारिरीक-मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीति इ. क्लेश दूर करावेत आणि या घोर- कलीकाळापासून या घोरसंकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो.

4 हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ ‘त्राता’ नाही. आपणासम दानशूर ‘दाता’ ही नाही. आपणासम भरण-पोषण करणारा ‘भर्ता’ ही नाही. हे आपण लक्षात घेऊन, हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणाऱ्या देवाधिदेवा, आपण माझा या ‘घोर’ संकटातून, माझ्यावर ‘पुर्ण- अनुग्रह’ करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.

5 सर्व प्रकारच्या कष्टातून, हे प्रभो, तू मला सोडव. त्या सगळ्यातून का सोडव, तर मला “धर्मा बद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी (वरील कष्ट दूर झाल्या नंतर) उत्पन्न होण्यास मदत होईल आणि तुझ्याबद्दलचा (पूज्य) भाव प्राप्त होईल. म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव.

6 या स्तोत्राच्या पठणाची फलश्रुती सांगितली आहे. तीत असे म्हटले आहे, की जो (मनुष्य) नित्यनेमाने या पाच श्लोकांचा पाठ करील तो श्रीदत्तास प्रिय होआहेत

एकूण या स्तोत्रात, दुःखाचा नाश, सुखाचा लाभ, धर्मप्रेम, ईश्वरभक्ती, सत्संग, सांसारीक सौख्य, भक्तिभाव आणि अंती मोक्ष या प्रमुख गोष्टींची मागणी केलेली आहे. प्रस्तुतचे स्तोत्र हे श्रीस्वामीमहाराजांसारख्या प्रभू दत्तात्रेयांचा पूर्ण कृपाशिर्वाद प्राप्त झालेल्या एका महान अधिकारी विभूतीच्या प्रासादिक लेखणीतून साकार झाले आहे. त्याशिवाय या स्तोत्राला त्यांचा पूर्ण आशिर्वाद ही आहे. हे स्तोत्र रोज नित्यनेमाने म्हणणाऱ्या भक्ताची सर्व दुःखे दूर होऊन दत्तकृपेचा लाभ होईल असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.…

Please Follow US & Like Me

Leave a Comment