ओम चिले दत्त | Om Datta Chile Maharaj

श्री चिले महाराजांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी गोकुळाष्टमीच्या शुभ दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जेऊर गावी झाला . हे गाव त्यांच्या आजोबा श्री बुरहान यांच्या होते. पण जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. श्री चिले महाराजांचे बालपण पैजारवाडी, जेऊर आणि कोल्हापूर येथे गेले. ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहीले. सुकुमार वयात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर विद्यालयात झाले. त्यांच्या बालपणी ते अनवाणी वा-याच्या वेगाने पळत असत. पहाणारे अचंबित होत असत. त्यांचे बोलणे बालपणापासूनच असंबद्ध वाटावे इतके वेडसरपणाकडे झुकलेले असायचे; परंतु त्या असंबद्ध वक्तव्यात खोल अर्थ दडलेला असायचा, हे त्यांच्या पुढील आयुष्यातील वाटचालीवरून आणि त्यांनी प्राप्त केलेल्या सिद्धींवरून लोकांना कळून चुकले.

जेव्हा संत महंत इतर लोकांबरोबर असतात तेव्हा ते वेगळे किंवा विशेष वाटत नाहीत. संत महंत जेव्हा लोकांमध्ये फिरत असतात तेव्हा त्यांची दखल घेतली जात नाही किंवा वेगळे म्हणून पाहिले जात नाही. पण त्यांचे काम झाले की, लोकांना त्यांची जाणीव व्हायला लागते. संतांनी लिहिलेल्या किंवा इतरांनी त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखनातून ते त्यांच्याबद्दल शिकतात. जर संताने काही खास स्थान मागे सोडले असेल, तर लोक त्यांना पाहण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी देखील तेथे जाऊ शकतात. अशांची समाधी असेल तर समाधी दर्शनही घेतात. या पैकी एक आहेत दत्त चिले महाराज !

चिले महाराजांबद्दल

चिले महाराजांचा पेहराव सफेद पँट किंवा लेंगा, पांढरा शर्ट किंवा कुडता आणि डोक्यावर काळी टोपी असा असे. ‘सुखात असताना आवर्जून दुःखाला आठवावं, दुःख आलं तर त्याला हसत सामोरं जावं, तर दुःखाची तीव्रता कमी होते!’ हे त्यांचे साधे तत्त्वज्ञान होते. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ हे भजन त्यांच्या मुखात नेहमी असे. श्री चिले महाराज हे एखाद्या विशिष्ट प्रकारचे मठ किंवा आश्रमाप्रमाणे अशी ओळख नव्हती. ते स्वतःच चालता बोलता मठ होते. कोल्हापुरातच चिखली येथील श्रीदत्ताच्या मंदिरात दर्शनार्थ गेल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आणि, ‘माझे मन, तुझे मन, काय सांगू जनांस?’, असे काहीतरी नित्याप्रमाणेच बडबडत ते बाहेर हिंडू लागले. लोक त्यांना दत्तावतारी अवलिया मानीत. भैरवनाथ मंदिर, मसाईच्या पठारावरील मसाई मंदिर, टेंबलाई मातेचे मंदिर (श्री त्रांबोली) आणि सिद्धेश्वर मंदिर आणि पाटील महाराजांचे कोठार, पाचपिंडी आणि श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणातील व्यासांचे दत्त मंदिर यासारख्या ठिकाणी भेट द्यायला खूप आवडते. त्यांनी लांबचा प्रवास केला, महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना,संतमहात्म्यांच्या तीर्थस्थानांना, समाधिस्थानांना, उगमस्थानांना भेटी दिल्या. तेथील स्थानांचे महत्त्व जाणून घेतले. जागोजागी लोकांना सदुपदेश केला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा विविध राज्यात त्यांचे अनेक भक्तसंप्रदाय तयार केला. त्यांनी अवतार काळात कोल्हापूर सातारा नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले.

श्री चिले महाराजांचे गुरू

श्री चिले महाराजांचे पहिले गुरू श्री गराडे महाराज. त्यांचेकडे अगदी लहानपणी सेवा केली. गराडे महाराज प्रसन्न झाले व म्हणाले,’बाळा, कोल्हापूरला माझे गुरू श्री सिध्देश्वर महाराजांकडे जा. सिध्देश्वर महाराज व पाटील महाराज हे माझे गुरू आहेत. ‘ धनकवडीचे अवलिया संत श्री शंकर महाराज यांना तर ते आपले थोरले बंधू (दादा) मानीत.

श्री चिले महाराज व शंकरमहाराज

श्री शंकर दत्त चिले महाराजांचे स्थान धनकवडी मठात आहे. श्री चिले महाराजांची एक स्वतंत्र खोली श्री शंकर महाराजांच्या उजव्या हाताला आहे. श्री शंकर दत्त चिले महाराज म्हणजे श्री शंकर महाराजांचे प्रतिरूप त्यांचे कार्य श्री शंकर महाराजां सारखेच तोच भाव तिच अवस्था जणू श्री शंकर दत्त चिले महाराज आणि श्री शंकर महाराज हे एकरूपच. जेव्हा धनकवडी मठाच्या सभामंडपाचे बांधकाम चालू होते आणि ते बांधकाम दोन वेळा पडले. असे ऐकण्यात आले की श्री शंकर महाराजांना सभामंडप व इतर सर्व गोष्टी नको होत्या. कारण श्री शंकर महाराजांनी कधीच आपल्या कार्याची गवगवा केला नाही. काही केल्या मठाचे काम पुढे जाईना त्यावेळी श्री शंकर दत्त चिले महाराजांनी नारळ ठेवून महाराजांना विनंती केली की भक्तांच्या इच्छेखातर त्यांच्या आसर्यासाठी तरी मठाचे काम पुढे जाऊद्या. आणि श्री शंकर दत्त चिले महाराजांची विनंती मान्य होउन मठाचे कार्य पूर्णत्वास गेले. अशा प्रकारे श्री शंकर दत्त चिले महाराजांच्या कृपेने आपल्याला धनकवडीचा मठ लाभला.

चिले महाराजांची समाधी

पूज्य चिले महाराजांचे महानिर्वाण १९८६ साली, वयाच्या चौसष्टाव्या वर्षी करवीरनगरातच झाले. कोल्हापूर शहरापासून वीस कि.मी.वर असलेल्या पैंजारवाडी येथे त्यांची समाधी त्यांच्या भक्तगणांनी बांधली आहे. पैजरवाडी हे पवित्र स्थान श्री चिले महाराजांचे भांडार आहे. त्यांचा आवडता प्राणी कासव होता, त्यामुळे कासवावरील त्यांचे प्रेम पाहून भाविकांनी कासवाच्या आकाराचे भांडार मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मंदिराची वैशिष्ठ्ये अशी आहेत हे कासवाच्या आकाराच्या घुमटाचे खांब-लेस स्ट्रक्चर असून 60 x 80 x 20 उंच सभामंडप आहे. यात घुमटाकार स्लॅब, संगमरवरी मजला, कासवाच्या डोक्यासारखी छत देखील आहे. याला लागून ध्यानासाठी चार लहान खोल्या आहेत, वेंटिलेशनसाठी आकर्षक कोरीवकाम केलेल्या संगमरवरी खिडक्या आणि मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 50 फूट लांब जागा आहे. प्रदक्षिणा करण्याचे ठिकाण आणि अंगण यांच्यामध्ये एक आकर्षक दगडी भिंत आहे. यात भाविकांसाठी भोजन, स्नानगृह (स्नानपूल) आणि शौचालये यांचीही सोय आहे.

PaijarWadi Chlie Maharaj

श्री दत्त अवतारी सद्गुरू श्री चिलेदेवांची अमृतवाणी –

  • देवाला जात जा.
  • देवाला नमस्कार कर चांगले होईल.
  •  रस्त्यावर पडलेले घेऊ नकोस.
  • आपलंच नशिब नाही त्याला काय करायचं?
  • तुझं आहे ते तुला मिळणारचं.
  • खाली बघत जा. कुणाला नावं ठेऊ नकोस.
  • कष्ट करुन खा. कुणाला फसवू नकोस.
  • कुणाचे हिसकाऊन घेऊ नकोस.
  • लॉटरी, सट्टा व जुगार खेळू नकोस.
  • देव देईल तसे रहा. देवासाठी पैसे खर्च करत जा.
  • उपवास कर (गुरुवार, सोमवार)
  • सोनं घेऊन ठेव.
  • गरीबावर प्रेम आणि माया कर.

या प्रमाणे तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर १००% तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना चांगले दिवस नक्की येतील. आजच्या युगात सीसीटीव्ही कॅमेरे लावून आपण रेकॉर्डींग पाहू शकतो तसे देवाकडे नक्कीच तुमच्या आयुष्याचे रेकॉर्डींग आहे.

Please Follow US & Like Me

Leave a Comment