अनुसूया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा | Anusuya Atri Sukumar Shripad Vallabh Digambara

आपण जी भक्ती भावाने काव्य, अभंग, पद्यरचना, गातो त्याला आपण भक्ती गीत असे म्हणतो. मनातील् परमेश्वराविषयी व्याकुलता, भक्ती, श्रद्धा, आस, आर्तता इत्यादी भक्तिमार्गातून प्रतीत होत असते.भारतामध्ये वैदिक काळापासून भक्ती मार्गातूनच आराधना होत आहे.भक्ती गीतातून मनातील भक्ती भावना व्यक्त केली अनेक अनेक उपासक, साधूसंत हे या भक्ती गीतातून परमेश्वराला आळवणी, विनवणी करतात.या भक्ती गीतांची रचना या त्यांच्या उत्स्फूर्त श्रद्धेतून निघालेले असतात.
मित्रांनो आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून अशीच एक भक्ती गीताची रचना जी श्री गुरुदेव दत्त यांच्या विषयी गायली गेली आहे ती येते आपण पाहणार आहोत.दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी, कानडी, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्तांची भक्ती गीते म्हटली आहेत.दत्तांची अनेक भक्ती गीते सुप्रसिद्ध आहेत त्यातले हे एक सुप्रसिद्ध भक्तीगीत आहे.

|| अनुसूया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

अनुसया अत्री सुकुमारा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

दत्त दयाघन दयावरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

पद्म कमंडलू गदा धरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

त्रिशूल हे शोभे करा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

षढवीत आयुढ परी करा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

पूर्णानंदा अवतारा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

सुभस्म रुद्राक्षा भरणा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

भव भय दु:ख निवारणा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

काश्यायांबर वसन धरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

श्री मेघ श्याम सुंदरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

अवधूता हे गिरीवरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

ओजस तेजोद्यूतीधरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

षडभूज मूर्ती वीरा जीता । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

विश्वरूप हे विश्वंभरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

भक्त प्रिय वज्रपंजरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

दिनांचा उद्धार करा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

दत्तात्रया अवतारा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

श्रीपाद नरसिंहवरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

नित्य निरंजन ओमकारा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

कलयुगी येसी आकारा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

जन्म घेशी तु पिठापुरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

सचित धन तु शुभंकरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

शाश्वत पावन तपोवरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

शब्द दाविसी ओमकारा ।श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

कृष्ण संगमी तरूवरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

नित्य वसे औदुंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

विप्ररूप वैराग्य वरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

प्रियजन हे परमेश्वरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

हे मुनिजन मानसचंद्रा ।श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

तु गुरुवर धैर्य समुद्रा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

जगधीशा जगत उद्धारा ।श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

उद्धारी मज गुरुवरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

करुणानिधी करुणाकारा ।श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

निर्गुण हे निर्विकारा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

गुरुराया कल्याण करा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

निजा नंदी द्रुड करा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

चिन्मय चीतघन चिदंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

अंतर योगी अगोचरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

ब्रम्हा विष्णू महेश्वरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

स्वामी समर्था कृपा करा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

दिगंबरा दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा

Download PDF FileDownload PDF File

अनुसूया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा | Anusuya Atri Sukumar Shripad Vallabh Digambara

Please Follow US & Like Me

Leave a Comment