श्री रेणुका आरती स्रोत स्तवन | Shri Renuka Aarti Stotra Stavan

जय देवी श्री देवी, रेणुका माते

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।

वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

भाग्यवती तूं जननी, परशुरामाची।

तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी।

तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला।

मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला॥४॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

श्री रेणुका आरती

श्री रेणुका स्तोत्र – स्तवन

अंबे महात्रिपुरभैरवी आदिमाये।

दारिद्र दुःखमय हारूनि दावी पाये ।

तुझा अगाध महिमा बढ़ती पुराणी ।

श्री रेणुके भगवते वरदे भवानी ॥१॥

आता क्षमा करि शिवे अपराध माझा ।

मी मुढ केवळ असे परी दास तुझा ।

तुं सोडशील मजलाझणिं तो निदानी ।

श्री रेणुके भगवते वरदे भवानी ॥२॥

निष्ठुरता धरिशी तुं जरि ध्यानी आई।

रक्षील कोण मज सांग उपाय काही ।

आनंद सिंधु लहरी गुण कोण वाणी ।

श्री रेणुके भगवते वरदे भवानी ॥ ३॥

लज्जा समस्त तुजला निज बालकाची।

तु माऊली अति स्वये कनवाळू साची ।

व्हावे प्रसन्न करूणा परि सोनि कानीं ।

श्री रेणुके भगवते वरदे भवानी ॥ ४ ॥

जाळीतसे बहूत हा भवताप अंगी ।

त्यांचे निवारण करी मज भेट वेगी।

तुझाच आश्रय असे जगी सत्यमानी ।

श्री रेणुके भगवते वरदे भवानी ॥५॥

नेणो पदार्थ तुजवांचोनि अन्य कांही ।

तू माय-बाप अवघे गणगोत पाही ।

आणिक देव दुसरा हृदयांत नाही।

श्री रेणुके भगवते वरदे भवानी‌ ॥६॥

तुंया त्रिभूवनांत समर्थ होशी ।

धाके तुझ्या पळसुटे रिपुदानवासी।

येती पुजेस सुर बैसोनिया विमानी ।

श्री रेणुके भगवते वरदे भवानी ॥७॥

हे चालले वय वृथा भुललो प्रपंची।

तूही करूनि स्थिरता न घडे मनाची ।

दुःखार्णैवांत बुडतो धरी शीघ्रपाणी

श्री रेणुके भगवते वरदे भवानी ॥ ८ ॥

श्री रेणुका स्तोत्र - स्तवन

Please Follow US & Like Me

Leave a Comment