रेणुका – यल्लम्मा देवी ( सौंदत्ती )

रेणुका (यल्लम्मा)  दक्षिण भारतातील एक मातृदेवता. कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे तिचे मुख्य स्थान आहे. ती कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या प्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात माहूरगडा व्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी रेणुकामाता यमाई, एकविरा, मोहटा,पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. भक्त तिला “साऱ्या जगाची आई” अर्थात “जगदंबा” मानतात.

रेणुका देवी अवतार

१. श्री यल्लम्मा देवी, सौंदत्ती
२. श्री यमाई देवी, औंध(मुळपीठ)
३. श्री एकविरा देवी, कार्ले
४. श्री अंबामाता देवी, अमरावती
५. श्री मोहटा देवी, मोहटा
६. श्री पद्माक्षी रेणुका, कावाडे(अलीबाग)

कथा

काश्मीर देशाचा राजा रेणू आणि त्याची पट्टराणी भोगावती हे दोघे ही मुलबाळ नसल्याने दु:खी होते.गौतम ऋषीच्या सल्याने त्यांनी मुकांबिका देविची उपासना केली त्याप्रमाणे देवीने त्यांना मी तुमच्या घरी अवतार घेईन असे वरदान दिले. बालदुर्गेच्या वरदाना प्रमाणे टाजाने यज्ञ केला. चैत्र कृ.पंचमीच्या दिवशी रविवारी यज्ञ कुंडातून देवी बालिका रुपात प्रकटली रेणुराजाची कन्या म्हणून ती रेणूका आदिशक्तीच्या बरोबरच शिवानेही अवतार घेतला. तो च्यवन ऋषींच्या घरी ऋचिक मुनींच्या पोटी जमदग्नी म्हणून. जमदग्नींनी स्वयंवरात रेणुकेला जिंकले तिचा आणि त्यांचा विवाह झाला. उभयताना पाच पुत्र झाले वसु विश्वासु बृहत्नानू, बृहत्कण्व आणि पाचवा पुत्र भार्गवराम त्याच्या हातातील परशु मुळे त्याचे नाव प्रसिध्द झाले परशुराम. एके दिवशी रेणुका मलपहारी नदीवर पाणी आणण्यास गेली तिथ गंधर्वाची जलक्रिडा पाहून ती विचलीत झाली तेंव्हा तिच्या सर्व सिध्दी नाहिश्या झाल्या. ऋषींनी तिला शाप दिला आणि ती कुष्ठी झाली. सौंदत्ती डोंगराच्या गुहेत राहणाऱ्या एकनाथ जोगी नाथ या सिध्दांनी तिला तिचे मुळ रूप परत दिले. रेणुका आश्रमात परत आली ऋषींनी चार पुत्रांना तिच्या वधाची आज्ञा दिली त्यांनी ते नाकरताच ते भस्म झाले पाचव्या परशुरामाने मात्र पित्याची आज्ञा पाळली पण वरदान म्हणून त्याने आईचे आणि भावांचे प्राण परत मागितले. तेंव्हा ऋषींनी मातंगीचे शिर जोडुन रेणुका देवीला पुन्हा सजिव केले. पुढे सहस्त्रार्जुनादी वैऱ्यांचा संहार करून परशुरामांनी माता-पित्याचे ऋण फेडले पृथ्वीचा भार हरण केला.आणि आपण स्वता चिरंजीव रुपात राहुन माता-पित्याची सेवा करत वाहिले. माता रेणुका महर्षी जमदग्नी आणि पुन्ना बरोबर आनंदात निवास करती झाली. हिच माता रेणुका सात गुणांच्या मदत क्षेत्री यल्लम्मा नावाने निवास करते. माहुर गडावर सती रेणुका नावाने तर काली मंदिरात तिला एकविरा म्हणून ओळखले जाते. पुढे कोल्हासुरा बटोबरच्या युध्दावेळी ती यमाई रुपात प्रकटली तर परशुराम ज्योतिबा रूपात या रूपात औंधासुटाचा वध करून रेणुका यमाई नावाने औंध गावी निवास करते.

येल्लम्मा नाव कसे पडले ?

रेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला, तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मधे आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्नींच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले.

रेणुका मातेची आरती

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
भाग्यवती तूं जननी, परशुरामाची।
तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी।
तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला।
मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला॥४॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

येल्लामा देवी मंदिराचा पत्ता:

येल्लामा गुड्डा, सौंदत्ती येल्लामा, कर्नाटक 591173, भारत

येल्लामा देवी मंदिर सौंदत्ती येथे कसे जायचे 

रेल्वेमार्ग : सर्वात जवळचे रेल्वे स्थानक धारवाड रेल्वे स्थानक आहे. धारवाड रेल्वे स्थानक सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांशी चांगले जोडलेले आहे.
हवाई मार्ग : जवळचे विमानतळ बेळगाव विमानतळ आणि हुबळी विमानतळ आहे.
रस्ता मार्ग : हे बेळगावी पासून 85 किलोमीटर अंतरावर आहे आणि इतर सर्व ठिकाणाहून रस्त्याने या ठिकाणी पोहोचता येते. शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर एक मोठा डोंगर आहे ज्यावर हे मंदिर आहे.

येल्लामा देवी मंदिर सौंदत्ती मंदिर उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा 

6:30 am – 4:30 pm
6:30 pm – 10:00 pm

सौंदत्ती कर्नाटक भारतातील येल्लामा देवी मंदिराबद्दल येथे काही माहिती

स्थळ: सौंदत्तीजवळ डोंगराच्या माथ्यावर, बेळगाव जिल्हा, कर्नाटक
कोणी बांधले: बोम्मप्पा नायक.
पार्किंग शुल्क: रु. 20/-
प्रवेश: विनामूल्य
विशेष प्रवेश: रु. १००/- , २००/-
मंदिराची वेळ: सकाळी 06:30 ते दुपारी 4:30, दुपारी 4:30 ते 10:00
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी
जवळचे रेल्वे स्टेशन: धारवाड रेल्वे स्टेशन
जवळचे विमानतळ: बेळगाव विमानतळ

Please Follow US & Like Me

Leave a Comment