श्री रेणुका आरती स्रोत स्तवन | Shri Renuka Aarti Stotra Stavan

श्री रेणुका

जय देवी श्री देवी, रेणुका माते जय देवी श्री देवी, रेणुका माते। आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती। वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते। आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ भाग्यवती तूं जननी, परशुरामाची। तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते। आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी। तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥ जय देवी श्री देवी, रेणुका … Read more

श्री सदगुरु शंकर महाराजांच्या आरत्ती-स्तवन | Aarti Stavans of Shri Sadguru Shankar Maharaj

Shri Shankar Maharaj

आरती शंकर श्री गुरुंची । करू या ज्ञानसागराची आरती शंकर श्री गुरुंची । करू या ज्ञानसागराची ||धृ० ॥ उजळल्या पंचप्राण ज्योती । सहजचि ओवाळू आरती । मिटवुनि क्षणिक नेत्र पाती । हृदयि स्थित झाली गुरुमूर्ती । श्रीगुरु दैवत श्रेष्ठ जनी । जणुं का भाविकास जननी ॥ संस्कृति पाश, सहज करिनाश, मुक्त दासास । करि करी कामधेनु आमुची । करू या ज्ञानसागराची || १ || ध्यान हे रम्य मनोहरसे । ध्यान … Read more

श्री जोतिबा/केदारनाथ आरती | Shri Jotiba/Kedarnath Aarti

श्री जोतिबा/केदारनाथ आरती | Shri Jotiba/Kedarnath Aarti

भगीरथी तुलसीतल हिमाचलवासी भगीरथी तुलसीतल हिमाचलवासी | न लगत पल खल दुर्जन संहारी त्यासी| तो हा हिमकेदार करवीरापाशी | रत्नागिरीवर शोभे कैवल्याराशी ॥१॥ जयदेव जयदेव जय श्री केदारा दासा संकटवारा भव भय निवारा ॥ धृ ॥ जयदेव उत्तरीचा देव दक्षिणी आला | दक्षिणकेदार नाम पावला | रत्नासूर मर्दनी भक्त रक्षियला | दास म्हणे, थोर भाग्य लाभला ॥२॥ जयदेव जयदेव जय श्री केदारा दासा संकटवारा भव भय निवारा ॥धु॥ जयदेव   … Read more

सांगावे कवणा ठाया जावे | Sangave Kavana Thaya Jave

सांगावे, कंवणा ठाया जावे

नारायणस्वामींना ब्रम्हलोकात नेण्याकरता पुष्पक विमान आलेले श्री गोपाल स्वामींनी ते पाहिले. त्याबरोबर त्यांनी श्रीनारायणस्वामीच्या चरणकमळी मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. नंतर श्रीनारायणस्वामी महाराज पुष्करारूढ झाले. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांप्रमाणेच, साक्षात् वैकुंठाला गेलेले हे दुसरे विभूतिमत्व होय. ही घटना फार जुनी नाही, इ.स. १८०५ मध्ये घडलेली आहे. या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिष्य श्री. गोपाळस्वामी यांनी त्याचे वर्णन करणारे पद रचलेले आहे. ते “सांगावे, कवणा ठाया जावे | ” हे पद … Read more

श्री स्वामीसुत महाराज | Shri Swamisut Maharaj

श्री स्वामीसुत महाराज | Shri Swamisut Maharaj

स्वामीसुत महाराजांचा जन्म तावडे घराणे जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अतिशय शूरवीर मराठा सरदारांचे घराणे होते. त्या घराण्यातील दाजीबा तावडे यांच्या पोटी स्वामीसुतांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म साधारण 1840 च्या दरम्यानचा असावा.त्यांचा जन्म विल्ये याा गावी झाला. स्वामीसुतांचे नाव हरिभाऊ तावडे असे होते. स्वामी सुतांना आठ भाऊ व चार बहिणी होत्या. हरिभाऊंचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते.ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. मुंबईतील दाजी सुभेदार या नातेवाईकाकडे स्वामीसुत राहू लागले. पुढील … Read more