श्री स्वामीसुत महाराज | Shri Swamisut Maharaj

स्वामीसुत महाराजांचा जन्म तावडे घराणे जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अतिशय शूरवीर मराठा सरदारांचे घराणे होते. त्या घराण्यातील दाजीबा तावडे यांच्या पोटी स्वामीसुतांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म साधारण 1840 च्या दरम्यानचा असावा.त्यांचा जन्म विल्ये याा गावी झाला. स्वामीसुतांचे नाव हरिभाऊ तावडे असे होते. स्वामी सुतांना आठ भाऊ व चार बहिणी होत्या. हरिभाऊंचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते.ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. मुंबईतील दाजी सुभेदार या नातेवाईकाकडे स्वामीसुत राहू लागले. पुढील शिक्षण घेत त्यांनी इंग्रजांची तयारी चालू केली. नोकरीचा शोध घेत असताना त्यांना मुंबई पालिकेत शहर सुधारणा खातेशहर सुधारणा खात्यात नोकरी मिळाली.

श्रीस्वामींची हरिभाऊंशी प्रथम भेटी

स्वामीसूत व त्यांचे सहकारी गजानन खत्री यांनी सटटयाचा व्यापार चालू कघडला. या व्यापारातून त्यांना मोठे नुकसान झाले व दंड ही झाला. या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी त्यांचे मित्र लक्ष्मण पंडित यांच्याकडे ते गेले. पंडिताने मनोमनी स्वामीरायांना चरणी नवस केला व यातून आम्हाला सोडवा अशी विनंती केली. व्यापारातून येणारा नफा आम्ही स्वामी चरणी अर्पण करू असे बोलले.काही काळाने व्यापारात हरिभाऊंना नफा झाला.हरिभाऊ या संकटातून बाहेर आले.यानंतर हरिभाऊंना पंडितांनी सांगितले की आपण नवस केला होता त्यानुसार आपल्याला नफ्यातील भाग स्वामी चरणी अर्पण करायचा आहे. यामुळे हे तिघेजण गजानन खत्री ,हरिभाऊ ,पंडित अक्कलकोटला निघाले.अक्कलकोटा ते राज जोशी गणपतराव जोशी यांच्यावाड्यात उतरले. पुढे सकाळी ते बुधवार पेठेतील सोळापाच्या घरी स्वामी भेटीस्तव गेले. तिथे स्वामी झोपाळ्यावर बसले होते ती तेजस्वी मूर्ती बघून तिघेही आनंदित झाले. तिघेही स्वामी रायांचे दर्शन घेत होते तेव्हा स्वामी म्हणाले “व्यापारात केला तोटा मला नवस केल्यावर झाला दोन हजार रुपयाचा नफा” स्वामी रायांचे शब्द ऐकल्यावर तिघेही चपापले कारण नवसाची गोष्ट तिघांशिवाय कुणालाही ठाऊक नव्हती.स्वामींच्या सर्वज्ञपनाचा अनुभव घेऊन तिघेही आश्चर्यचकित झाले.तिघे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले.

1968 साली फेब्रुवारी महिन्यात एक विशेष प्रसंग घडला.तिघे पुन्हा अक्कलकोटला आले पण यावेळी त्यांचे सामान चोरला गेले तेव्हा ते पोलिसा तक्रार करून अंगातील कपड्यांशी स्वामी पुढे गेले व सर्व प्रसंग स्वामींना सांगितला. स्वामी महाराज ताडकन म्हणाले, “सुंठीवाचुन खोकला गेला.” यावर तिघेही गप्प झाले. नंतर स्वामी गजानन खत्री याला म्हणाले, “बाजारात जाऊन धोतर घे. डोईस बांध.” लक्ष्मण पंडितास म्हणाले, “तू डोक्याला रुमाल बांध.” त्याचवेळी मात्र हरीभाऊंचा त्यांनी हात धरला व जवळ ओढले. अगदी आपल्या जवळ घेत म्हणाले, “तू आपल्या कुळावर पाणी सोड व माझा सुत हो.” अशाप्रकारे स्वामींनी हरीभाऊंच्या डोक्यावर आपल्या कृपा करुणेची गंगाच ओतली. पुढे ते हरीभाऊंना म्हणाले , “साथ में पैसा लाया है । उन पैसों का सफेदा लेके आव.” हरीभाऊ ना सफेदा काय हे कळले नाही. तेव्हा त्यांनी तसे स्वामींना लागलीच विचारले तेव्हा स्वामींनी आपल्या पायास स्पर्श करुन दाखविले. हरीभाऊंना लगेच स्वामीराय पादुकांबद्दल बोलत आहेत हे लक्षात आले. तो दिवस होता एकादशीचा. दुसर्या दिवशी द्वादशी ला तिघांनीही स्वामींना नैवेद्य करुन नेला. त्यावेळी तिघांनाही स्वामींनी प्रसाद दिला व तिघांनाही तिनं श्लोक सांगितले. त्यात हरीभाऊंना “गुरुर ब्रह्मा” हा श्लोक सांगितला. आपल्याला मिळालेला प्रसाद घेऊन तिघेही परत बिर्हाडी आले. नंतर स्वामी आज्ञा घेऊन तिघेही मुंबईस परतले. मुंबईत आल्यापासून आता हरीभाऊ चिंतनात मग्न राहू लागले. सतत स्वामीरायांचेच ध्यान ते करु लागले. त्यांना आता संसार हा निरस वाटुन लागला.

श्री श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी १४ दिवस वापरलेल्या याच त्या “आत्मलिंग पादुका”

श्री स्वामीसुत महाराज | Shri Swamisut Maharaj

हरिभाऊ ने जो आपल्या व्यापारातील नफा झाला होतात्या नफ्यातून त्याने अतिशय सुंदर व नक्षीदार अशी चांदीच्या पादुका घडून आणल्या. त्या पादुका त्यांनी अक्कलकोटला घेऊन आले.त्या पादुका त्यांनी स्वामीं पुढेत्या पादुका त्यांनी स्वामीं पुढे ठेवल्या.स्वामीनारायण लगेच त्या पादुका आपल्या पायात घातल्या व स्वामी महाराज सर्वत्र ते पादुका घालून फीरू लागले.त्या स्वतःजवळ त्या पादुक ठेवून घेतल्या. स्वामी उद्गारले “हे माझे आत्मलिंग आहे” मी कोणास ते देणार नाही.पुढे चौदा दिवस या आत्मलिंग पादुका स्वा मींनी वापरल्या व चौदाव्या दिवशी स्वामीसुत दर्शनाला आले. तेव्हा त्यांना जवळ ओढले ,त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, “तू माझा सुत आहेस. तु आपला सर्व धंदा-रोजगार सोडून बंदर किनार्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ,ध्वजा उभी कर.” मग त्यांनी ते आत्मलिंग उचलून आपल्या हाताला, पायाला, तोंडाला आणि अन्य अवयवांना लावून हरिभाऊंना म्हणाले, “दोन्ही हात जोडुन उभा रहा”.नंतर आपल्यापुढे त्यांना तिनं उठाबशा काढण्यास सांगितले. मग म्हणाले , “हे माझे आत्मलिंग तुला त्या मुंबापुरी किल्ल्यात मांडण्याकरिता दिले आहे. आजपासून तु माझा सुत झालास. आता तू माझ्या पोटावरुन हात फिरव व पादुका मस्तकावर धारण कर.” स्वामी सुतांनी तसेच केले. खरंतर ही तर पूर्ण स्वामी कृपा होती. ही कृपा होताच स्वामीसुत बेभान झाले. त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. अंग थरथरु लागले. स्वामींनी हा स्वामीसुतावर केलेले शक्तीपातच होता. सबंध स्वामींच्या चरित्रात इतकी विलक्षण कृपा स्वामींनी कुणावरही केली नाही.हा प्रसंग झाल्यावर हरीभाऊ एका रात्री स्वामींचे पाय चेपत बसले होते. तोच मध्यरात्री स्वामी माउली उठले. त्यांनी बिछान्याखालुन एक छाटी,एक कफनी आणि माळ काढुन ती हरीभाऊंच्या अंगावर फेकली व त्यांना म्हणाले, “आपला संसार लुटवून टाक. ही वस्त्रे परिधान कर. दर्याकिनारी ध्वजा लाव.” सकाळीच स्नान करुन हरीभाऊ ती वस्त्रे नेसून स्वामींपुढे उभे राहिले. त्यावेळी त्यांनी आपल्या मस्तकावर ते आत्मलिंग धारण केले होते. नंतर स्वामी आज्ञा घेऊन ते मुंबईस परतले.

स्वामीसुतांवरील श्रीस्वामीकृपेचीच अलौकिक प्रचिती

हरिभाऊ मुंबईस आल्यानंतर स्वामींच्या आज्ञेनुसार त्याने आपली घरातील वस्तूप्रत्येकाला भेट देण्यास सुरुवात केली त्यांच्या अठरा वर्षांच्या पत्नी ताराबाईंना हा तर आघातच होता. बायकोचे चौर्यांशी तोळे सोने त्यांनी वाटून टाकले. इतकेच काय तर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ही त्यांनी ठेवले नाही. घरातील गुरे ,ढोरे सर्व संपत्ती ही वाटून आता स्वामी सुत निःसंग झाले. आपल्या बायकोला स्वामी नामाचा उपदेश करुन तिला सफेद वस्त्र दिले हाती एकतारी दिली व स्वतः भगवे वस्त्र परिधान करुन टाळ-विणा घेऊन स्वामी नामात दंग झाले. घरच्यांना , आप्तांना , गावकऱ्यांना हा बदल म्हणजे एक आश्चर्याचीच बाब झाली. याचा बायकोनी कडाडून विरोध जरी केला तरी स्वामी सुत थांबले नाही. बायकोला वारंवार ते सावध करु लागले. स्वामीसुतांनी कामठीपुरातील आपल्या घरालाच मठ केले. तिथेच ते दिवस रात्र स्वामी नामात ,भजनात दंग असत. आता तिथे लोक येऊ लागले. मुंबईतील कुणी जर अक्कलकोट ला स्वामी दर्शनास गेले तर त्यांना स्वामी स्वामीसुतांकडे जाण्यास सांगत. स्वामीसुतांकडे आता पारशी, मराठी, सोनार, पाठारे , प्रभू अशा विविध समाजाची लोकं श्रद्धेने येऊ लागले. कारण ही तसेच होते. स्वामी पादुका रुपात प्रत्यक्ष तिथे हजर होते. त्यामुळे प्रत्येकाला प्रचितीही येत होती.हरिभाऊ म्हणजे स्वामीसुत हे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते ते प्रत्यक्ष स्वामी भगवंत च्या अवतारातील प्रिय पार्शद होते. स्वामींचे प्रिय सखे होते. याची साक्ष प्रत्यक्ष स्वामीरायांनीच स्वामींना दिली होती.

एकदा स्वामीसुत अक्कलकोट ला स्वामी दर्शनाला गेले असता त्यांना स्वामींनी जवळ बोलावून आपल्या पोटावर हात फिरवण्यास सांगितले. अनंतकोटी ब्रह्मांडे ज्याने रचली व ज्यांच्या उदरातील पोकळीत ती सहज लिलेने प्रस्थापित झाली आहेत त्यांच्या बाह्य पदराला स्पर्श होताच स्वामीसुतांना आपल्या पूर्व जन्माचे अनेक प्रसंग दृश्य स्वरुपात दिसायला लागले. त्या दर्शनाने ,त्या दिव्य प्रकाशाने ते चक्रावून गेले. त्यांना दिसले की ते पूर्वजन्मात मध्य हिंदुस्थानातील  हस्तिनापूर पासून चोवीस मैलांवर असलेल्या छेली खेडे गावात विजयसिंह नामक एक रजपुत बालक होते. एका पवित्र वटवृक्षाखाली श्री विनायक मंदिरासमोर ही अवतार लिला घडली.
विजयसिंह बालक रोज एकटाच गोट्यांचा खेळ खेळत असे. एक डाव भगवंतांचा  व एक डाव स्वतःचा अशी त्याच्या खेळण्याची पद्धत होती. जवळच्या लोकांना,मुलांना हा प्रकार हास्यास्पद वाटते असे. परंतु चैत्र शुद्ध द्वितीया , बहुधान्य संवत्सरे,गुरुवार दिनी,शालीवाहन शक १०७१ सन ११४९ या पवित्र दिनी एक अघटित प्रकार घडला. आधी ‘कडकड’ असा मोठा आवाज झाला. हा आवाज धरणीच्या गर्भातून येत होता. आसपासची सारी माणसे भयाने इतस्तत: पळू लागली. विजयसिंह मात्र तिथेच उभा होता. काही क्षणात धरणी दुभंगली व त्यातून एक अष्टवर्षीय सुकुमार मूर्ती बाहेर आली. श्रीस्वामी महाराज हे त्या दिवशी नुसतेच प्रगटले नाहीत तर त्यांनी विजयसिंह बरोबर गोट्याही खेळल्या.

स्वामीसुत महाराज विरचित अभंग

श्रीस्वामीसुतांनी स्वामी माउलींवर “स्वामी विजय” नामक एक ग्रंथ लिहीला त्याचा द्वितीय खंड म्हणजे श्रीस्वामी अवतारकांड होय. त्यात त्यांनी स्वामींच्या प्राकट्यासंबंधी सखोल वर्णन केले आहे.स्वामीसुत आपल्या अभंगातून ही या लिलेचे वर्णन करतात स्वामी सुत लिहीतात

“स्वामी अवताराचि काय सांगु मात । मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा ।।१।।

गोटी खेळामाजी अवतार हा जाला । रामशिंग भला दास त्यांचा ।।२।।

गुरुवार द्वितीय चैत्र शुद्धबरी । हरी  बरोबरी खेळावया ।।३।।

आश्विन नक्षत्र प्रीती योग होता । जगाचा दाता अवतरला ।।४।।”

पुढील एका अभंगात ते लिहीतात –

“दत्त माझा अवतरला ।। दीन भक्ताच्या काजाला ।।

छेलीखेड्या ग्रामामाजी ।। जाला अवतार सहजी ।।

गोटी खेळण्याचा रंग ।। तेव्हा हरी झाला दंग ।।”

पुढील एका अभंगात म्हणतात –

“धर्णी दुभंगून केली दरी ।। स्वामीराज आले वरी ।।

अष्टवर्षी सुकुमार ।। रुप दिसे हे सुंदर ।।”

श्रीस्वामीसुत महाराज खूप छान भजन करीत असत. त्यांच्या अभंगरचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करीत त्या त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवीत असत. श्रीस्वामीसुतांनी रचलेला ३१ अभंगांचा ‘श्रीस्वामीपाठ’ अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे, खूप भक्तांना त्याच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात; ही स्वामीसुतांवरील श्रीस्वामीकृपेचीच अलौकिक प्रचिती आहे.

दुर्बुद्धि वासना कधीं उपजों नेदी।
सांभाळावें आधीं तयेवेळीं।।
सर्व अंगीकार दीनाचा करावा।
मज नाचवावा अपुल्या गुणी।।
ऐशापरी सोय करुनी, दयाळा।
तुझें स्वरूप डोळां दाखवावें।।
स्वामीसुत म्हणे संकल्प त्वां केला।
जीवन्मुक्त झाला बाळ तुझा।।

श्रीस्वामीसुत महाराजांच्या श्रीचरणीं अनंत दंडवत प्रणाम!

स्वामी हो समर्था ऐसे आता करी ॥ तुझ्या चरणावरी चित्त राहो ॥ १ ॥
तुझे हे स्वरूप दिसो दृष्टी पुढे ॥ नाचवावे कुडे प्रेमरंगे ॥ २ ॥
प्रेमरंगे अंगी असो निरंतर ॥ आणिक तो भर भावभक्ती ॥ ३ ॥
स्वामीसुत म्हणे तुझ्या चरणांवरी ॥ माथा ऐसे करी कृपावंत ॥ ४ ॥
– श्री स्वामीसुत महाराज

अशा स्वामी भगवंतांचे प्रत्येक अवतारातील सखे असणारे स्वामी सुत एक दिव्य महापुरुष होते यात शंका नाही.

स्वामीसुतांच्या निर्वाणाची कथा

एकदा स्वामी दर्शनाला अक्कलकोट येथे स्वामीसुत गेले असता तिथे ते स्वामींपुढे भजनात नाचु लागले. स्वामीरायांना बघता क्षणीच स्वामीसुत आपले देहभान हरपले आणि आनंदाने चिपळ्या घेऊन नाचु आगले. आत्मानंदात बेभान झालेल्या स्वामीसुतांना त्यामुळे पायातील खडावा काढण्याचे ही भान राहिले नाही. हेच तेथील मत्सरी,कपटी आणि स्वामीसुतांचा द्वेष करणार्या लोकांनी हेरले. त्यांनी स्वामीसुतांना धक्काबुक्की करत अपमान करुन त्या पादुका काढल्या. स्वामीसुतांना आपला हा अपमान सहन झाला नाही. ते तात्काळ मुंबईत परतले. स्वामींनी अनेकवार अक्कलकोटला येण्यास निरोप पाठविला पण ते काही परत आले नाही. शेवटी स्वामी़नी “आता तोफ उडवतो” म्हणून निरोप दिला व स्वामी नामात दंग असलेले स्वामीसुत श्रावण वद्य प्रतिपदेला स्वामी रुपात,स्वामी चरणी लिन झाले. स्वामीसुतांच्या आईने खुप दुःख केले ,हंबरडा फोडला तेव्हा स्वामीराय त्यांना म्हणाले , “माय रडु नको.मी तुझा लेक आहे. त्याला आम्ही उंचपदावर नेऊन ठेवले आहे.” पुढे चौदा दिवस सुतकात ही स्वामीभगवंत काकुबाईंना जवळ घेऊन मुलासारखे सांत्वन करत होते. “उंचावर नेऊन ठेवले” हे खरंच महत्वाचे वाक्य आहे. आपल्या प्रिय सुताला दत्तलोकातील कुठल्या उंच पदावर नेऊन ठेवले असेल याचा आपण विचार ही करु शकत नाही.

स्वामीसुतांच्या गादीपरंपरा

त्यांनीच स्वामींचा १८७० ला प्रथम प्रगटदिन आपल्या मुंबईतील मठात भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला. अशा प्रकारे मुंबईची गादी स्थापन झाल्यावर तेथून स्वामी कार्य अत्यंत जोमाने सुरु झाले. स्वामीसुतांनी मुंबईमध्ये श्रीस्वामींची गादीपरंपरा सुरू केली. स्वामीसुतांच्या अकाली जाण्यानंतर पुढे ही परंपरा स्वामीसुतांचे धाकटे बंधू सच्चिदानंद स्वामीकुमार आणि त्यांच्या नंतर स्वामीसुतांची कन्या सीता अर्थात सिद्धाबाई नलावडे यांनी अतिशय भक्तीभावपूर्ण श्रद्धेने चालवली. सिद्धाबाईंच्या पश्चात त्यांचे नातू हरीभाऊ आणि नातसून शारदामाई यांनी चेंबूर मठाचे वैभव दिसामासाने वृद्धिंगत केले. सध्या कांदेवाडी मठ अस्तित्वात असला तरीही श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका आणि अन्य वस्तू स्वामीसुतांच्या वंशजांकडे अर्थात चेंबूर येथील श्रीस्वामी समर्थ मठात आहेत. या मठामध्ये आत्मलिंग पादुकांचे पूजन, गुरुपौर्णिमा, श्रीस्वामीसुत पुण्यतिथी आणि श्रीदत्तजयंती हे वार्षिक कार्यक्रम संपन्न होतात. त्या शिवाय श्रीस्वामीसमर्थांच्या जयंतीचा उत्सव श्रीस्वामीसुतांनी आखून दिलेल्या नियमांनुसार, प्रथेनुसार आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो.

Shree Swami Samarth Math (Chembur Math)श्री स्वामी समर्थ मठ (चेंबूर मठ) पत्ता

सहकारी भंडार समोर, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, जैन मंदिराजवळ, चेंबूर गावठाण, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र 400071

श्री स्वामी समर्थ मठ (चेंबूर मठ) मार्ग

 

 

 

Please Follow US & Like Me

Leave a Comment