कफनाशक हनुमान स्तोत्र मराठी
समर्थ रामदास रचित कफनाशक हनुमान स्तोत्र एकदा असे झालं की समर्थ रामदासांना दर्या खोऱ्यांमधून हिंडत असताना त्याच्या घशात खूप कफ आणि खूप खोकला झाला होता, काही केल्या तो जात नव्हता. त्यावेळेला त्यांनी हनुमंताची एक स्तोत्र रचून उपासना केली. एक स्तोत्र असून त्याची आराधना केली आणि त्या स्तोत्रांच्या समाप्तीनंतर रचनेनंतर त्यांच्या कफ आणि खोकला तात्काळ नाहीसा झाला. ते असे हे कफनाशक हनुमान स्तोत्र
फणीवर उठविला,वेग अद्भुत केला
त्रिभुवन जन लोकी, कीर्तीचा घोष केला
रघुपती उपकारे, वाटले थोर भारे
परमधिर उदारे, रक्षिले सौख्य सारे ||1||
सकळ दळ मिळाले, युद्ध उदंड झाले
कपिकटक निमाले, पाहत्तां येश गेले
परदळ शरधाते, कोटीच्या कोटी प्रेते
अभिनव रणपाते, दुःख बिभीषणाते ||२||
कपिरिस घनदाटी, जाहली थोर दाटी
म्हणवूनी जगजेठी, धावणे चार कोटी
मृतविर उठविले, मोकळे सिद्ध झाले
सकाळ जन निवाले, धन्य सामर्थ्य चाले ||३||
बहुप्रिय रघुनाथ, मुख्य तू प्राणदादा
उठवि मज अनाथा, दूर सारून व्यथा
झडकरी भीमराया, तुं करी दृढ काया
रघुवीर भजनाया, लाग वेगेसी जाया ||४||
तुजविण मजलागी, पाहतां कोण आहे
म्हणवुनी मन माझे, तुझी रे वाट पाहे
मज तू निरवीले, पाहिजे आठविले
सकाळी निजदासा, लागिं सांभाळविजे ||५||
उचित हित करावे, उद्धरावे धरावे
अनुचित न करावे, त्या जनी येश यावे
अघटीत घटवावे, सेवका सोडवावे
हरीभजन घडवावे, दुःख ते बीघडावे ||६||
प्रभूवर विरराया, जाहली वज्रकाया
परदळ निवटाया, दैत्यकुळे कुटाया
गिरिवर तुडवाया, रम्य वेशा न ठाया
तुजसी उलगडाया, ठेविले मुख्य ठाया ||७||
बहुत सबळ साठा, मागतो अल्प वाटा
न करीत हित काटा, थोर होईल ताठा
कुपणपण नसावे, भव्यलोकी दिसावे
अनुदिन करुणेचे, चिन्ह पोटी वसावे ||८||
जलधर करुणेचा, अंतरामाझी राहो
तरी तुझं करुणा हे, कां तये सांग पाहो
कठीण हृदय झाले, काय कारुण्य केले
न पवसी मजला रे, म्या तुझे काय नेले||९||
वडीलपण करावे, सेवकां सावरावे
अनहित न करावे, तूर्त हाती धरावे
निपटाची हटवावे, प्राचीला शब्द भेदे
कपि घन करुणेचा, बोळला राम तेथे||१०||
बहुतची करुणा ही, लोटली देवराया
सहजची कफ गेला, जाहली दृढ काया
परमसुख विलासे, सर्व दासानुदासे
पवनजा अनुतोषे, वंदिला सावकाश| |११||