Mahila samakhya yojana
राज्य शासन बसमधून प्रवास करणाऱ्या विशिष्ट गटांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृद्ध लोक विनामूल्य प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे
महाराष्ट्रातील सरकारने महिलांना बसच्या तिकिटावर सवलत देण्याची योजना आखली आहे. त्यानुसार राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली. 17 मार्च 2023 पासून महिलांना एसटी महामंडळाकडून कोणत्याही प्रकारच्या बस तिकिटाच्या किमतीत अर्धी सूट मिळू शकते.
महिला सन्मान योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये
1 . सर्व महिलांना 17 मार्च 2023 पासून, मिट्टी/मिनी, निमाराम, बिगर वातानुकूलित शयनयान, शिवशाही (आसन), शिवनेरी शिवाई (साधी व वातानुकूलित) इतर यासह महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस 50 % सवलत देतील
२ . महाराष्ट्रातील महिलांना सवलत देणारा या योजना ही महिला सन्मान योजना या नावाने ओळखली जाणार आहे
३ . सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंतच लागू करण्यात आलेली आहे.
४ . सदर सवलत शहरी वाहतूकीस लागू नाही.
५ . ज्या महिलांनी रा.प. एसटी महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना 50% सवलतीचा परतावा देण्यात येणार नाही.
६ . सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुवीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
७ . सर्व महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.
८ . सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.
९ . जेव्हा महिला प्रवास करतात तेव्हा त्यांना 50% ची विशेष सवलत मिळते. परंतु त्यांना सवलत मिळेल याची खात्री करण्यासाठी तिकीट स्वतंत्रपणे छापावे लागेल. वाहक प्रत्येक महिलेला तिचे तिकीट विशिष्ट रंगात देईल.
१० . महिलांना प्रवास करताना निम्म्या किमतीत सवलत मिळावी. परंतु काहीवेळा तिकिटे देणारी संगणक प्रणाली कदाचित काम करत नाही, त्यामुळे महिलांना सवलत मिळावी हे दाखवण्यासाठी कागदी तिकीट असणे आवश्यक आहे. या कागदी तिकिटांची रु. 10/-, रु. 20/- रु.30/-, रु.40/- रु.50/- व रु. 100/ अशी वेगवेगळी असते.
११ . सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये 77 क्रमांकावर प्राप्त होईल.
१२ . लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणा-या विनामुल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करणेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.)
१३ . 75 वर्षांपेक्षा मोठी महिलाअसेल तर तिला ‘अमृत जेष्ठ नागरिक’ या विशेष कार्यक्रमाद्वारे सर्व काही मोफत मिळू शकते.
१४ . ५ ते १२ मा वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल
१५ . ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ ही सवलत अनुशेष राहिल.
महिला सन्मान योजनेंतर्गत अवघ्या एका महिन्यात एसटीतील ४.२ कोटी महिलांनी हाफ तिकिटावर प्रवास केला. ‘महिला सन्मान योजने’मुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सहा लाखांनी वाढ झाली असून, कोल्हापूर विभागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे.पहिल्या दिवसापासून या योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सरासरी १४ लाखांहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. एसटीचा दररोजचा प्रवासी सरासरी ५५ लाख आहे. यातून एसटीला 4 कोटी 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर विभागात महिनाभरात 30 लाख 24 हजार महिला प्रवास केला.