सर्व एलपीजी गॅस धारकांसाठी अतिशय आनंदाची व मोठी बातमी आहे. नागरिक मित्रांनो तुमच्याकडे जर प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या Ujjwala Yojana अंतर्गत गॅस कनेक्शन असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत आता तुम्हाला प्रती सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. याच्या विषयी संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
Ujjwala Yojana Benefit
24 मार्च 2023 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेच्या मार्फत तुम्हाला प्रतिवर्ष 12 गॅस सिलेंडरला 200 रुपये सबसिडी सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत तुम्हाला वार्षिक 12 सिलेंडर दिले जाणार आहेत.1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झाली.2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 साठी 7,680 कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. ही रक्कम तेल विकणाऱ्या काही मोठ्या कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.
Pradhanmantri Ujjwala Yojana
केंद्र सरकार गरीबांना मदत करण्याच्या विविध सरकारी योजना आखत असते. ‘त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Pradhanmantri Ujjwala Yojana आहे. देशात अनेक कुटुंब हे दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत .बर्याच कुटुंबांकडे स्वयंपाकासाठी गॅस विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात, म्हणून ते लाकूड वापरतात. यामुळे पर्यावरणाची हानी होते आणि लोक आजारी पडू शकतात. या कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत १ मे २०१६ रोजी Pradhanmantri Ujjwala Yojana संपूर्ण भारतात सुरु करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत १४.२ किलो वजनाचा एक मोठी गॅस टाकी मिळेल आणि डोंगराळ भागात शासनाने ५ किलो वजनाचे २ लहान टाकी [सिलेंडर]उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही योजना 5 कोटी कुटुंबांना मदत करण्यासाठी बनवण्यात आली होती,मात्र आता 8 कोटी कुटुंबांना मदत होणार आहे. योजनच्या दुसऱ्या टप्प्यात, गॅसकनेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला सरकार एक पूर्ण गॅस सिलिंडर मोफत देईल आणि त्यांना गॅसचे पैसे भरण्यासाठी सरकारकडून 800/- रुपये मिळतील.
नवीन अपडेट उज्वला गॅस सब्सिडी
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री नरेंद्र सिंह यांच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे. नरेंद्र सिंह तोमर असे म्हटले आहेत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती वर्ष 12 सिलेंडर दिले जाणार आहेत व प्रत्येक सिलेंडर वरती 200 रुपये सबसिडी देखील दिली जाणार आहे व याला केंद्राने देखील मंजुरी दिलेली आहे. अशाप्रकारे अतिशय महत्त्वाचा निर्णय 24 मार्च 2023 रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ही सबसिडी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आजच तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करा कारण सबसिडी मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.