नारायणस्वामींना ब्रम्हलोकात नेण्याकरता पुष्पक विमान आलेले श्री गोपाल स्वामींनी ते पाहिले. त्याबरोबर त्यांनी श्रीनारायणस्वामीच्या चरणकमळी मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. नंतर श्रीनारायणस्वामी महाराज पुष्करारूढ झाले. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांप्रमाणेच, साक्षात् वैकुंठाला गेलेले हे दुसरे विभूतिमत्व होय. ही घटना फार जुनी नाही, इ.स. १८०५ मध्ये घडलेली आहे. या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिष्य श्री. गोपाळस्वामी यांनी त्याचे वर्णन करणारे पद रचलेले आहे. ते “सांगावे, कवणा ठाया जावे | ” हे पद श्रीदत्त संप्रदायात विनवणीचे पद म्हणून दररोज आवर्जून म्हटले जाते. श्रीनृसिंहवाडीला पालखीच्या शेवटी जे “सांगावे कवण्या ठाया जावे” हे पद म्हणतात, ते श्री गोपाळस्वामी महाराजांनीच केले आहे. श्री गोपाळ स्वामी महाराजांनी या पदाने श्री दत्त प्रभूंचा धावा केल्यावर, इनाम जमिनी पेशव्यांनी गोपाळस्वामी महाराजांच्या सांगण्याने देवस्थानाकरिता कायम केल्या. तसेच शुक्लतीर्थापाशी असलेली सोळा एकर स्वत:ची जमीन गोपाळस्वामी महाराजांनी दत्त महाराजांच्या स्थानासाठी देऊ केली. आजही ही जमीन समाधीची जमीन म्हणून ओळखली जाते.
सांगावे, कंवणा ठाया जावे | कवणा तें स्मरावें ।
सांगावे, कंवणा ठाया जावे | कवणा तें स्मरावें ।
कैसें काय करावें | कवण्या परि मी रहावें |
कवण येऊनि कुरूंदवाड स्वामीतें मिळवावें ॥ धृ ॥
या हारी जेवावें व्यवहारीं । बोलावें संसारी ।
घालुनि अंगिकारी | प्रतिपाळिशी जो निर्धारी |
केला जो निजनिश्चय, स्वामी कोठें तो अवधारी ॥ १ ॥
या रान माझी करूणावाणी | काया कष्टी प्राणी ।
ऐकुनि घेतिल कानी | देशिल सौख्य निदान |
संकट होऊनि मूर्च्छित असतां, पाजिल कवण पाणी || २ ||
त्या वेळा सत्पुरूषांचा मेळा | पाहतसे निजडोळां ।
लाविसि भस्म कपाळा । सांडी भय तूं बाळा |
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती अभय तुज गोपाळा || सांगावे. ॥ ३ ॥
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ||