Shri Balappa Maharaj | प. पू. श्री बाळप्पा महाराज

गुरु शोधार्थ घर सोडून निघालेले बाळाप्पा ते प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ माउलींचे उत्ताराधीकारी बाळप्पा महाराज असा विलक्षण जिवन प्रवास आपण बघुयात.श्रीस्वामी माउलींच्या ि प्रभावळीतील अतिशय विलक्षण थोर सत्पुरुष ज्यांच्या थोर अधिकाराने त्यां स्वामीरायांच्याही प्रेमाचा अधिकार प्राप्त केला, ज्यांना स्वामीरायांनी आपली समाधी लिला करण्यापूर्वी आपल्या समक्ष आपल्या गादीवर बसवून पुढे संप्रदाय वाढविण्याचे, चालवण्याचे कार्य सोपवले.आशा प. पू. श्री बाळप्पा महाराजांचा जीवन प्रवास नक्कीच गुरुसेवा ही का असते, कशी असती आणि किती कठीण असते याचा विवेक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही.

श्री बाळाप्पा महाराज कोण होते

बाळाप्पा महाराजांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथील हावेरी या खेड्यात झाला. त्यांचं घर एक सावकारी सराफी व्यवसाय असलेल्या धनि संपन्न अशा यजुर्वेदी ब्राह्मण घराण होते. बालपणापासुनच वैराग्यशिल आ धार्मिक अशी बाळप्पांची वृत्ती होती. त्यांचे लग्न पुर्वीच्या रिवाजाप्रमाणे बालपणीच‍ झाले. त्यांना दोन मुलगे आणि एक कन्या अशी अपत्येही झाली. परंतु मुळातच विरक्त असलेल्या बाळप्पांचे मन संसारात रमले नाही. बालपणापासुनच वैराग्यशिल आ धार्मिक अशी बाळप्पांची वृत्ती होती.थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आटोपून आता ते घर सोडण्याचा विचार करु लागले. आपण का जन्माला आलो? आपल्या जन्माचे प्रयोजन काय ? केवळ प्रपंच हाच आपला अंतिम उद्देश आहे का? असे अनंत विचार त्यांच्या मनात घोळत होते. या प्रश्नांची उव करण्यासाठी आता सद्गुरु चरणांचा आश्रय घ्यावा असे त्यांना सतत वाटु लागले. वयाच्या तिसाव्या वर्षी शेवटी त्यांनी सद्गुरू शोधार्थ ते बाहेर पडले.त्यांनी आधी शिवचिदंबर महाप्रभुंच्या मुरगोड कडे प्रस्थान केले. तिथे त्यावेळी महाप्रभुंचे चिरंजीव हे गादीवर होते. तेथील पुजार्यांनी महप्रभुंच्या झालेल्या दिव्य लिलांचे वर्णन केले ते ऐकून बाळाप्पा थक्क झाले. पुजार्याक‍ त्यांना चिदंबर महाप्रभु आणि अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या भेटीची हकिकत कळली. अजानुबाहु स्वामी हे अजुनही सदेही अक्कलकोट येथे वास्तव्यास आहेत ही ही कळले. पण त्यांच्या मनात आधी श्रीक्षेत्र गाणगापूर जाऊन अनुष्ठान करावे हा विचार होता. त्यामुळे ते गाणगापूर ला गेले. श्रीक्षेत्र गाणगापूर येथे प्रखर कठोर असे अनुष्ठान केल्यावर त्यांना दत्तप्रभुंचे स्वप्न द‍ झाले पण स्पष्ट आज्ञा नसल्या कारणाने त्यांनी अनुष्ठान सुरुच ठेवले. पुढे एक ब्रह्माण स्वप्नात आला व “तुम्ही अक्कलकोटला जावे” असा स्पष्ट आदेश त्य मिळाला. दोन महिने संगमावर अनुष्ठान झाल्यावर त्यांना तिथेच पहाटे संगमस्नान करण्यास गेले. तिथे काठावर धोतर ठेवले होते. आल्यावर उचलले त्याखावी लाल असा विंचु दिसला. त्यांनी त्यास न मारता ते आपल्या नित्यक गुंग झाले. त्याच रात्री त्यांना भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजां प्रत्यक्ष दर्शन घडले व त्यांना अक्कलकोट ला येण्याचे संकेत स्वामींनी दिले. स्वामीरायांच्या दर्शनानंतर दुसर्या दिवशी त्यांना माधुकरी या वेळी पाचह घरी पुरणपोळीच मिळाली. हा शुभसंकेत लक्षात घेऊन त्यांनी त्याच दिवशी अक्कलकोट ला प्रस्थान केले.

चैत्र शुद्ध दशमी शके १७८८, २५ मार्च १८६६ या दिवशी बाळप्पा अक्कलकोटला आले. तेथील मुरलीधर धर्मशाळेत आपले सामान त्यांनी स्नान उरकले व एक पैशाची खडीसाखर घेऊन स्वामी दर्शनासाठी निघाले.स्वामी स्वारी त्यावेळी खासबागेत आपल्याच मस्तीत दंग आनंदात निमग्न होती. स्वामीरायांपुढे पोचल्यावर ते बेभान होऊन श्रीचरणांकडे जाऊ पोचले. श्रीस्वामीरायांच्या सुकोमल चरणांवर शिर ठेवले. नंतर खडीसाखर स्वामींपुढे ठेवली व बाजुला झाले. हे सर्व झाल्यावर स्वामीदेवांची पहुडलेली स्वारी उठली त्यांना इतका आनंद झाला होता की तो आनंद प्रत्येकाला जाण होता. स्वामी ऊठुन झाडाजवळ गेले व प्रत्येक झाडाला प्रेमाणे आलिंगन देऊ‍ लागले. जणु यातुन त्यांनी आपले बाळाप्पा वरील जन्मोजन्मीचे प्रेमच व्यक्त केले. त्यानंतर बाळप्पा महाराज हे अक्कलकोट लाच अनुष्ठानरत झाले. त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामी चरणी समर्पण केले. श्रीस्वामी राजवाड्यात ८ दिवस राहण्यास होते. बाळप्पांचे दर्शन होईना. मंदिरातच त्यांनी तपश्चर्या व जपसेवा सुरू केली. एकदा दर्शनाची संधीही मिळाली. पण महाराजांनी त्यांना प्रसाद दिला नाही. बाळाप्पा दु:खी झाले ते सोडून सर्वांना स्वामींनी प्रसाद दिला. नंतर त्यांना समजले स्वामींना जे जावेत असे वाटत त्यांना ते प्रसाद देऊन बोलवीत असत. हे समजल्यावर त्यांना अधिक आनंद झाला व त्यांनी सेवेची व्याप्ती व एकनिष्ठता वाढवली. त्यांना आनंद वाटे की दत्तावतारी स्वामींची सेवा करण्याची संधी मिळत आहे.रोज स्वामी दर्शनाचा त्यांनी नियम केला. पण या काळात त्यांच्या मनात एक रुख लागली होती ती म्हणजे त्यांना कधीही काहीही केल्या स्वामींच्या हाताने प्रस मिळाला नाही. एकदा गर्दीतुन चोळप्पांनी बाळप्पांच्या हातावर खारकांचा प्रर टाकला. प्रसाद मिळता क्षणी बाळाप्पा धावतच सुटले तोच स्वामींनी चोळप्पां रागविले आणि प्रसाद परत आणावयास सांगितले. सेवेकर्यांनी धावत जाऊन प्रसाद परत आणला. या सर्व घटनेने बाळाप्पा खुप खिन्न झाले. पण त्यांना क ठाऊक स्वामी माउली त्यांना आपल्या स्वानंद सिंहासनावर विराजमान करण आहेत ते. पुढे बाळप्पांना द्वारकेला जाण्याची आज्ञा झाली व तिर्थयात्रेहून पर आल्यावर त्यांना स्वामींनी आपल्या हातातील तुळशीची माळ दिली. हा पहि प्रसाद बाप्पांना लाभला. त्यानंतर चैत्र महिन्यात बाळप्पांनी मुरलीधर मंदिरात आपले पहिले अनुष्ठान केले. पण त्यावेळी त्यांचे आपले अधेमधे मन लागत नसे. रोज ते माधुकरीला जाण्याआधी श्रीस्वामीरायांच्या चरणी आपले मस्त ठेवत व मनसोक्त दर्शन घेत असत. यावेळी स्वामी दर्शनास गेले असता. श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या पाठीवर जोरदार हाताचा फटका दिला. पण या प्रसादाने पुढे त्यांचे चंचल मन अगदी स्थिर झाले. या आगळ्या वेगळ्या स्वार्म प्रसादाच्या लाभाने त्यांचे अनुष्ठान फळाला आले. पुढे बाळप्पा जास्तीत जार स्वामी सेवेत रत होऊ लागले. चोळप्पांच्या संमतीने लवकरच इतर सेवेकऱ्यांसमवेत ते स्वामींची अखंड सेवा करण्यासाठी पेठेत राहण्यास गेले. बाळप्पा अगदी निस्सिम व समर्पणाने स्वामी सेवा करू लागले. एक दिव अचानक त्यांच्या बेंबीतून रक्त येऊ लागले. काही वेळात बेंबीतून एक कागदा पुडी पडली. ती बाळप्पांनी उघडली तर त्यात विष होते. बाळप्पांची निस्सिम बघून कुणी नतद्रष्टाने मत्सरापोटी बाळप्पांना विष दिले होते. तरीही पुढे त्यांच स्वामी सेवा उत्तरोत्तर वाढतच आणि दृढ होत गेली.एकदा स्वामी देवांनी बाळप्पांना आवाज दिवा व आपल्या जवळ बोलावले. त्यावेळी स्वामीराय खडीसाखर खात होते. ती तोंडातील खडीसाखर त्यांनी काढली व आपल्या हाताने बाळप्पांना खाऊ घातली. बाळप्पा स्वामी प्रसादासाठी आसुसले होते त्यांनी क्षणाचाही विचार न करता ती खडीसाखर क्षणात खाऊन टाकली. ज या प्रसादाद्वारे स्वामी रायांनी बाळप्पांच्या शरीरात आपल्या कृपेचा प्रत्यक्ष अंशच रुजविला. तरीही या दरम्यान अनेक सेवेकऱ्यांनी बाळप्पांचा अतोनात छळ केला,त्यांना अक्कलकोटहून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण श्रीस्वामीरायांनी आपल्या या पट्टशिष्याला आता सख्य भक्तीचे दानचं दिले त्यामुळे कुणीही त्यांनी तेथून हलवू शकले नाही. पुढे सुंदराबाईंनी बाळप्पांना हरएक प्रकारे त्रास दिला. या त्रासाला कंटाळून बाळप्पांनी अक्कलकोट सोडण्याचा विचार केला तोच स्वामी महाराजांनी बाळप्पांना एका सेवेकऱ्या करवी मृगाजिन व व्याघ्राजिन दिले. चाणाक्ष बाळप्पांना लगेच कळले की स्वामीरायांची आपल्याला अक्कलकोट सोडण्याची आज्ञा नाही. नंतर स्वामी आज्ञेनी त्यांनी अक्कलकोटातील जागृत असलेल्या हाक्याच्या मारोती जवळ अनुष्ठान सुरु केले. सुरुवातीला बाळप्पा गणेशाची अथर्वशीर्ष म्हणून उपासन करीत. तर स्वामीराय एका सेवेकऱ्याला बाळप्पांना उद्देशून म्हणाले “तो तरर्ट वाणित आहे”. बाळप्पांना याचा गुढार्थ लगेच कळला व त्यांनी ते अनुष्ठान बं केले व “श्री स्वामी समर्थ” या स्वामी मंत्राचे जप अनुष्ठान सुरु केले. त्यावेळी स्वामींना एका सेवेकऱ्याने विचारले की आता बाळप्पा काय विणतो आहे त स्वामी राज म्हटले, “आता तो कांबळी विणीत आहे.” स्वामीरायांनी बाळप्प जपाचा हिशोब ठेवण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ते तो हिशोब चोख ठेवीत अनुष्ठाना दरम्यान सुंदराबाईंनी स्वामी रायांपुढे बाळप्पांच्या अनुष्ठानाचा विष काढला तर स्वामीराय म्ह्टले, “तो कुलदीपक आहे.” या स्वामीरायांच्या एक वाक्यातच त्यांनी बाळप्पांचा अधिकार, त्यांच्यावरील आपली कृपा सर्वांना दाखवून दिली होती. आता आपल्या गादीचा वारसदार कोण यावर या द्वारे स्वामींनी शिक्कामोर्तब केला होता. पुढे बाळप्पांच्या या अनुष्ठानाची सांगता स्वतः स्वामीरायांनी एका भक्ताद्वारे ब्राह्मणभोजनाने केली. पुढे सन १८७४ श्रावण वद्य १ ला स्वामी सुतांनी आपला देह मुंबईत ठेवला आणि बरोबर एव वर्षांनी स्वामी देवांनी आपली समाधी लिला करण्याचे योजले.

सिद्ध मंत्र ‘श्री स्वामी समर्थ

बाळप्पाचे पोट दुखायचे. नाभीस्थानांत एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे. ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. बरेच जप केले पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.मग स्वामी समर्थांनी सांगितले एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे अक्कलकोट येथील हाफक्याच्या मारुती मंदिर श्री. बाळप्पा गेले, तेथे सतत एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली.म्हणून ‘श्री स्वामी समर्थ’, हा शास्त्र शुद्ध स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला जप मंत्र आहे.

श्री स्वामी समर्थांनी बाळप्पाना प्रारब्धाबद्दल काय संगीतले होतो.

बाळप्पाना स्वामी यांना विचारले प्रारब्ध यावर काही उपाय नाही का?यावर स्वामी म्हणाले ‘एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे-पुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच
लागते. बाळप्पा,यांनी ‘स्वामी,विचारले मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे?’ स्वामी म्हणाले म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पापं घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वरभक्ती करायची असते.जेव्हा दु:खाचे वारे सुटते, तेव्हाच ईश्वराची कास सोडते. म्हणतो, ‘मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळ्या, पण तो हे विसरतो की, देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली, ती ज केली नसती, तर आणखी भयाण संकट आले असते.’ त्यामुळे सर्व सेवेकरी बांधवांनी स्वामींवर विश्वास ठेऊन स्वामी कार्य करत राहावे.

स्वामी समर्थांनी आपल्या सर्व भक्तांना काही दिवस आ जवळ बोलावून काही तरी वस्तू प्रसाद रुपाने दिली. पण बाळप्पांना मात्र नेह प्रमाणे काहीच दिले नाही. पण न राहवून बाळप्पांनी काकुळतीला येऊन, “महाराज, सर्वांना प्रसाद दिलात, मला आपण काय देणार?” हा प्रश्न विचारला. त्यावेळी श्रीस्वामी महाराजांनी आपल्या उजव्या हातातल्या करंगु असलेली “श्री स्वामी समर्थ ” ही अंगठी काढली व ती स्वहस्ते बाळप्पांच्या हातात घातली व महाराज उद्गारले, “माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे. माझ शिक्का यआवच्चंद्रदइव आकरौ तू पुढे चालव.” असा आशिर्वाद मिळताच बाळप्पा गदगदीत झाले, कृतकृत्य झाले. त्यांनी स्वामी चरणांना मिठीच मारली. श्री स्वामीरायांनी बाळप्पास आपल्या जवळ बसविले. आपल्या कंठा रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घातला. अंगावर छाटी घातली. हातावर भगवे निशाण दिले. प्रासादिक चरणपादुका दिल्या व मस्तकावर वरदहस्त ठेवून, “औदुंबर छायेत बस. स्वतंत्र मठ स्थापन करुन पादुकांची प्रतिष्ठापना कर. बाग करुन फुलझाडे लाव व वार्षिक ठरलेले उत्सव करीत जा.” अशाने सुयोग्य फळ मिळेल.” या अर्थाचा श्रीमद भागवताचा एक श्लोक ही स्वामी रायांनी म्हटल लगेच चैत्र वद्य १३ शके १८००, सन १८७८ ला स्वामीरायांनी आपली समाधी लिला केली. पुढे तीन वर्ष स्वामी आज्ञेने बाळप्पा निराशन व्रत करुन राहिले स्वामी विरहाने ते अतिशय व्याकुळ झाले. त्यांनी अन्न तर त्यातले होते पण अ फराळ आणि पाणी ही त्यागले व विरहाकुल ते समाधी पुढे दिवसरात्र बसून राहिले. काही काळाने श्री स्वामी भगवंत बाळप्पांच्या पुढे प्रगट झाले व म्हटले “तुला मी ज्या पादुका दिल्या आहेत, तेथे चैतन्य रुपाने मी प्रत्यक्ष वास करी आहे. या पुढे मी तुझी सेवा तेथेच घेईन. पूर्वीप्रमाणे माझी सेवा करीत जा.” य नंतर मात्र बाळप्पांच्या मनातील सर्व संदेह पूर्ण मिटला. त्यांनी त्या प्रसाद पाद् पेटीतून बाहेर काढल्या व त्यांची स्थापना चौरंगावर केली. जवळच भगवे निश् ठेवले. महाराजांना प्रत्यक्ष जे उपचार करीत ते या दिव्य पादुकांवर सुरु केले.’ स्वामींनी आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यास आपण खरंच समर्थ आहोत का? अशी शंका त्यांना आली तोच स्वामींनी त्यांना प्रगटून पुन्हा अभ दिले की, “इथे तू काही करत नसून, जरी मी देहाने अंतर्धान पावलो तरी तुझ द्वारे मीच कार्य करणार आहे. सर्वत्र माझी सत्ता आहे. तू केवळ निमित्तमात्र आहेस. पादुकांच्या द्वारा सर्वत्र संचार करुन लोकसंग्रह करावा.” सुरवातीला पेठेतील पुजाऱ्याकडे बाळप्पांचा मुक्काम असायचा. तेथेच ते नित्य पूजा व उत्सव करीत असत.पुढे स्वामी कार्यास्तव बाळप्पा महाराजा वऱ्हाड, खानदेश, विदर्भ,, कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी प्रांती भ्रमण करु लागले प.पू.बाळप्पा महाराजांनी अखंड फिरून स्वामी नामाची ध्वजा सर्वत्र फडकवीली. स्वामी नामाच्या ते अखंड स्मरणात असतं. शरण आलेल्या भक्तां ते स्वामींचे तिर्थ आणि अंगारा देत व त्यांना संकटातून, आधी-व्याधीतून मुक्त करत. बाळप्पा महाराजांनी अनेक स्वामी मठाची स्थापना केली. त्यांना अनेक भक्त शरणं आले व शिष्य संप्रदाय मोठ्याप्रमाणात वाढला. बाळप्पा महाराजांच्या अनेक दिव्य लिला चरित्रात आल्या आहे. त्यांना शरणं आलेल्य आर्त, अर्थार्थी, मुमुक्षु, ज्ञानी, जिज्ञासु साधकाला ते त्यांना समजेल असे मार्गदर्शन करीत व मार्ग दाखवित. पुढे त्यांनी गंगाधरपंत शिगवेकर यांची आ उत्तराधिकारी म्हणून निवड केली. पुढे सन १९०१ ला बाळप्पा महाराजांनी स्व मठाची स्थापना केली. हा मठ आज गुरुमंदीर या नावाने आपल्या सर्वांना श्रुत् आहेच. पुढे माघ शुद्ध चतुर्थी शके १८२६, सन १९०४ ला बाळप्पा महाराजां‍ चतुर्थाश्रम धारण केला व ब्रह्मानंद सरस्वती हे नाम धारण केले. श्री बाळप्पा महाराजांनी स्वामी आज्ञेनंतर कधीही अन्न प्राशन केले नव्हते पण त्यांनी केलं कार्य,प्रवास बघितला तर बुद्धी सुन्न होते. पुढे पौष पौर्णिमा, शके १८३१, सन् १९१० रोजी श्री ब्रह्मानंद सरस्वती तथा बाळप्पा महाराजांनी प्रिय शिष्य गंगाधरपंत यांना गुरुगादीचे सर्व अधिकार विधीपूर्वक बहाल केले. आज्ञापत्र दिले. त्यांना स्वामींचा दंड, छाटी व माळ दिली व आपण अखेरची निरवा निर करु लागले. अखेर फाल्गुन मास उजाडला. चतुर्थीचा दिवस, मंगळवार अंगा योग. पहाटेच्या सुमुहूर्तावर श्री ब्रह्मानंद सरस्वती तथा बाळप्पा महाराज उर्ध्व दृष्टी लावून बसले. त्यानंतर त्यांनी स्नान केले. मग आपल्या आसनावर न बस गाभाऱ्यात गेले.तिथे स्वामी पादुकांना डोळे भरुन पाहिले. पुढे आसन स्वामी प्रतिमेपुढे घेण्यात आले. त्यावर येऊन बसल्यावर श्री बाळप्पा महाराज हाता जपमाळ घेऊन अखंड स्वामींकडे बघत होते. हळूच ते म्हटले, “अरे असे पाह काय! मी कोठेच जाणार नाही. या आसनावरुन उठेन व आत जावून बसेन.” असे म्हटल्यावर काही काळ स्वामी नाव घेत घेत अचानक ओंकाराचा उच्चा करीत स्वामी चरणी लीन झाले. पुढे बाळप्पा महाराजांच्या देहाची यथासांग प करण्यात आली.महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. वटवृक्ष देवस्थानात पेठेतल्या समाधी मठात मिरवणूक नेण्यात आली. त्यानंतर गुरुमंदिरातील चै पादुकांसमोरच ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज तथा बाळप्पा महाराजांना समाधी देण्यात आली. अशा या अतिशय अलौकिक, दिव्य व थोर स्वामी शिष्याची आज पुण्यतिथी. श्री बाळप्पा महाराज म्हणजे स्वामी सेवेचे सगुण मूर्तीमंत रुपच होते. प्रत्येक स्वामी भक्ताने, गुरुभक्ताने कशाप्रकारे गुरुसेवा का याचा हे चरित्र परीपाठच आहे.

गुरु मंदिर (बाळाप्पा महाराज मठ) मंदिर पत्ता 

G6C4+MPW, जुना अडत बाजार, विद्यानगर, अक्कलकोट, महाराष्ट्र ४१३२१६

दर्शनाची वेळ | Timings for darshan

मंदिर उघडते – सकाळी ६ ते  बंद – रात्री १० वाजेपर्यंत

गुरु मंदिर (बाळाप्पा महाराज मठ) मंदिरात कसे जायचे?

हवाई मार्ग : सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ आहे. जे मंदिरापासून अंदाजे २९० किमी अंतरावर आहे.

रेल्वे मार्ग :  मंदिरापासून जवळचे रेल्वे स्टेशन सोलापूर रेल्वे स्टेशन आहे, जे मंदिरापासून अंदाजे ४६ किमी अंतरावर आहे. तेथूनच msrtc बस मिळते

रस्ता मार्ग :  सोलापूर पासून १०५ किमी/ २ तास अक्कलकोट बस स्थानकापासून ३ किमी आहे.

Please Follow US & Like Me

Leave a Comment